22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामासलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून खुलासा

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल आरोपपत्रात करण्यात आलेल्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या नेमबाजांना उत्साह देण्यासाठी भाषण केले. हे भाषण तब्बल नऊ मिनिटांचे होते, असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

एप्रिल महिन्यात मुंबईच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घराबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या गुप्ता आणि पाल या दोन व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. पुढे या प्रकरणात अनेकांना अटकही झाली. यात आता नवी माहिती समोर आली आहे. एका ऑडिओ भाषणात अनमोल बिश्नोईने दोन नेमबाजांना सांगितले की, ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट करणार आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या १,७३५ पानांच्या आरोपपत्रानुसार, अनमोल बिश्नोईने नेमबाजांना सांगितले की, हे काम चोखपणे करा. काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लोक इतिहास लिहाल.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !

रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!

अनमोल बिश्नोई याने नेमबाज गुप्ता आणि पाल यांना धार्मिक कार्य करणार असल्याचे सांगून प्रोत्साहन दिले. तसेच हे काम करताना घाबरू नका. हे काम म्हणजे समाजात बदल घडवून आणणे, असा सल्लाही दिला. यासोबतच त्याने सलमान खानला गोळीबार करताना घाबरायला हवे असे म्हटले आहे. अशा प्रकारे शूट करा की सलमान खान घाबरेल. आरोपपत्रात म्हटले आहे की, बिश्नोईने विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना निर्भय दिसण्यासाठी हेल्मेट न घालण्यास आणि सिगारेट ओढण्यास सांगितले. गोळीबार करण्यापूर्वी अनमोल बिश्नोई गुप्ता आणि पाल यांच्या सतत संपर्कात होता, असे पोलिसांनी म्हटले आहे. शूटर आणि इतर तीन, सोनू कुमार बिश्नोई, मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल सिंग यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लॉरेन्स बिश्नोई, अनमोल आणि रावतरण बिश्नोई हे आरोपपत्रात वॉन्टेड आरोपी आहेत. अनमोल कॅनडात असल्याची माहिती असून त्याच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा