झारखंडच्या दुमका जिल्ह्यात अंकिता नावाच्या १२ वीत शिकत असलेल्या तरुणीला तिचा वारंवार पाठलाग करणाऱ्या शाहरुख हुसेन नावाच्या तरुणाने जिवंत जाळल्याची संतापजनक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या या घटनेत ती तरुणी मृत्युमुखी पडली असून संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे.
शाहरुख हुसेन हा अंकिताचा सतत पाठलाग करत असे पण तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. २३ ऑगस्टला सकाळी त्याने तिच्यावर हल्ला केला. शाहरुख हा तिचा शेजारीच होता. पण तो रोज तिला त्रास देत असे. त्याने तिला मैत्री करशील का म्हणून सातत्याने विचारणा केली होती. नेहमी तिला फोन करून मैत्री व संबंध ठेवण्यासंदर्भात तो बोलत असे. हे सहन न झाल्यामुळे तिने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात स्थानिक पोलिस अधिकारी नूर मुस्तफा अन्सारी यालाही दोषी धरले पाहिजे असा आग्रह लोकांनी धरला आहे. कारण मुस्तफाने या संपूर्ण प्रकरणात बेपर्वाई दाखविली. त्याने ही मुलगी सज्ञान असल्याचे म्हटले होते. पण प्रत्यक्षात ती मुलगी अल्पवयीन असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मुस्तफाला निलंबित करा आणि शाहरुखला मृत्युदंडाची शिक्षा द्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हे ही वाचा:
राम मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण, या दिवशी भाविकांना घेता येणार दर्शन
अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैवानजवळ दिसताच चीन म्हणाला…
राष्ट्रीय क्रीडादिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन
एसटी कर्मचाऱ्यांची आज बैठक; पण ११८ निलंबित कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचे काय
२३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेत शाहरुखने अंकिताच्या घरात प्रवेश केला. ती तिच्या खोलीत झोपलेली असताना त्याने खिडकीतून तिच्यावर पेट्रोल टाकले आणि तिला जाळले. त्यानंतर भाजलेल्या अवस्थेत तिला दुमका येथील मेडिकल कॉलेजला नेण्यात आले. त्यानंतर तिची गंभीर स्थिती पाहता रांचीला तिला नेण्यात आले. पण तिथे तिचा मृत्यू झाला. रविवारी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपा यांच्यासह अनेक संघटनांनी याविरोधात रस्त्यावर उतरत तीव्र निषेध केला.