गोमांस तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला

गोमांस तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला

गोमांसाची सुरू असलेली बेकायदेशीर तस्करी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुंबईतील दोन प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आशिष बारीक आणि प्रतीक ननावरे असे या दोन कार्यकर्त्यांचे नाव आहे. आशिष बारीक याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर प्रतीक ननावरेच्या पाठीत दंडुक्याने मारण्यात आले. या दोघांसोबत दोन पोलीस अधिकारी सुद्धा होते. त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली.

आशिष बारीक आणि प्रतीक ननावरे या दोघांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की बेकायदेशीर गोमांसाचे तस्करी करणारा एक ट्रक मुंबईतील कसाईवाडा भागाकडे जाणार आहे. यासंदर्भात त्यांनी रविवार, १६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता मुंबई पोलिसांना कळवले. या ट्रक वर छापा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळवण्याची त्यांनी विनंती केली. त्याप्रमाणे दोन पोलीस अधिकारी आणि हे दोघे सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीतून या ट्रक वर छापा घालण्यासाठी गेले. पोलिसांची गाडी ट्रॅक्टरचा पाठलाग करत होती. गोमांस घेऊन जाणारा हा ट्रक जसा बडा मशिद परिसरातील कसाईवाडा भागात गेला. तेव्हा ४० जणांच्या एका टोळीने काठ्या आणि रॉड घेऊन यांच्यावर हल्ला चढवला.

हे ही वाचा:

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू

उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन

यामध्ये आशिष बारीक याला लक्ष करण्यात आले. त्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने वार केला गेला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या संपूर्ण प्रकारानंतर आशिषला सायन हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. तर प्रतीक ननावरे याने चुनाभट्टी पोलीस स्थानकात जाऊन या संपूर्ण प्रकरणात तक्रार केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत सात जणांना अटकही केली आहे.

Exit mobile version