अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडायला सुरुवात

देशमुख, मलिक, राऊतांनंतर अनिल परब यांची वेळ

अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडायला सुरुवात

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीच्या साई रिसॉर्टचे पाडकाम आजपासून सुरु झाले आहे. यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीला रवाना झाले आहेत. साई रिसॉर्ट परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

आज पहाटे किरीट सोमय्या स्वत: मोठा हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले आहेत. दापोली पोलिस स्टेशनला भेट देऊन त्यांनी याप्रकरणी आपला जबाबही नोंदवला आहे. साई रिसॉर्टचे पाडकाम करायला सुरुवात झाली असून, सोमय्या त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. येत्या काही दिवसांत हे रिसॉर्ट जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.

साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. पहिला गुन्हा दापोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यानुसार, अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला बनावट कागदपत्रे देऊन हे रिसॉर्ट स्वत:च्या नावावर करून घेतले. तर दुसरा गुन्हा सदानंद कदमांविरोधात दाखल झाला आहे. कोविड काळात त्यांनी अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम केले, असा आरोप आहे. या गुन्ह्यात आता अनिल परब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, तिसरा गुन्हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्टचे बांधकाम केले म्हणून भारत सरकारनेच दाखल केला असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींना जिवे मारण्याची धमकी

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय पांडे हे तुरुंगात आहेत. तर संजय राऊत हे आता जामिनावर असून, आता अनिल परब यांची वेळ आली आहे, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.

Exit mobile version