27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाही तर रिसॉर्टमधील सांडपाण्यावरून ईडीने केलेली चौकशी!

ही तर रिसॉर्टमधील सांडपाण्यावरून ईडीने केलेली चौकशी!

Google News Follow

Related

अनिल परब यांचा दावा

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी, खासगी निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर परब यांनी त्याविषयी स्पष्टीकरण देताना केवळ दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यावरून केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली गेल्याचे सांगितले.

जवळपास १३ तास चौकशी झाल्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ईड़ीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थानावर मी राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या येत होत्या. ईडीची कारवाई होणार अशा बातम्या येत होत्या. या मागचा गुन्हा काय हे तपासले असता लक्षात आले की, दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट जे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की, ते सदानंद कदम यांचे आहे. त्यांनी मालकी हक्क सांगितलेला आहे. कोर्टात दावाही केलेला आहे. त्यांनी खर्चाचे हिशेब दिलेले आहेत. आयकर खात्याला दिलेले आहेत. त्यांच्यावर आयटीची रेड झालेली आहे. अजूनही हे रिसॉर्ट पूर्ण झालेले नाही. असे असताना पर्यावरणाची दोन कलमे लावून सांडपाणी समुद्रात जाते, असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलिस स्टेशनात दाखल केला. जे रिसॉर्ट सुरूच नाही, प्रांताने रिपोर्ट दिलेला आहे, पोलिसांनीही दिलेला आहे. तरीही माझ्या नावाने, साई रिसॉर्टच्या नावाने नोटीस काढली गेली. तक्रार दाखल केली गेली. त्या तक्रारीनुसार माझ्यावर छापेमारीची कारवाई केलेली आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहे.

परब यांनी सांगितले की, मी सांगत आलेलो आहे. ज्या यंत्रणा कुठालाही प्रश्न विचारतील ती मी देणार. या पूर्वीही उत्तरे दिली आहेत. आजही दिलीत. मला प्रश्न विचारले तर यापुढेही माझी तयारी असेल. समुद्रात जर सांडपाणी जात असेल तर मनीलॉन्ड्रिंगचा विषय कुठे आला. याचा खुलासा कोर्टात होईल. चौकशीअंती सगळे स्पष्ट होईल. मी चौकशीला सामोरा गेलो आहे. यापुढेही जाईन. मी प्रत्येक गोष्टी कायद्याला सामोर ठेवून बोलत असतो.

हे ही वाचा:

मोदी सरकारचे आठ वर्षात,आठ मोठे निर्णय

अनिल परब जेलमध्ये जाणारच

मोदी सरकारच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये भारत नंबर वन

सचिन वाझे देणार अनिल देशमुखांविरोधात साक्ष

 

परब म्हणाले की, आजची चौकशी रिसॉर्टबाबत होते. सहा कोटींचा घोटाळा केल्याचा कोणताही रिपोर्ट नाही. आयकरचे रिपोर्ट यायचे आहेत. या पेरलेल्या बातम्या आहेत. रिपोर्ट येतील तेव्हा सत्य बाहेर येईल. काही कागदपत्रे ईडीने आज माझ्याकडून घेतली, मी ती दिली. बाकी काही जप्त केलेले नाही.

एका पत्रकाराने विचारले की, ईडीने कोणते प्रश्न विचारले यावर परब म्हणाले की, बाहेर कोण पत्रकार आहेत ज्यांना १३ तास थांबावे लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा