मनपा अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना वांद्रे न्यायालयाने ११ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम असे चौघांची नावे आहेत. शिवसेना नेते (उबाठा) अनिल परब यांचे देखील १ नंबर आरोपी म्हणून प्रथम खबरी अहवालात नाव असून अनिल परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असल्याचे कळते.
मुंबईत वाकोला पोलिसांनी मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेना शाखा (शाखा कार्यालय) पाडण्याचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल घडवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी माजी नगरसेवकासह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्या ची माहिती पोलिस उपायुक्त(परिमंडळ ८) दीक्षित गेडाम यांनी दिली होती.
सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून कुठल्याही क्षणी अनिल परब यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली होती. पण परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून मारहाणीत आणखी कोण होते का याचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारी, शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठाकरे गटाने एच/पूर्व प्रभागाच्या कार्यालयावर शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.
हे ही वाचा:
पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?
कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वॅगनर ग्रुप
या दरम्यान एका मनपा अधिकार्याला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम या चौघांना याप्रकरणात अटक केली आहे, अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून कुठल्याही क्षणी अनिल परब यांना अटक होऊ शकते अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.