26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाअनिल जयसिंघानीसाठी राबविलेले ऑपरेशन एजे ७२ तासांनी ठरले यशस्वी!

अनिल जयसिंघानीसाठी राबविलेले ऑपरेशन एजे ७२ तासांनी ठरले यशस्वी!

मुंबई पोलिसांनी त्याच्या अटकेविषयी दिली माहिती

Google News Follow

Related

अमृता फडणवीस यांना धमकावणारा बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या अटकेची सविस्तर माहिती दिली. त्यातून जयसिंघानी कसा पोलिसांना चकवा देत होता. त्यासाठी कसे तंत्रज्ञान वापरत होता याची माहिती समोर आली.

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली की, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच वर्षांपासून फरारी असणारा आरोपी अनिल जयसिंघानीला अटक करण्यासाठी पाच दिवसांपासून मोहीम राबविली जात होती. ऑपरेशन एजे नावाने ही मोहीम सुरू होती.

पोलिसांनी सांगितले की, सदर आरोपी हा इंटरनेट, मोबाईल टेक्नो याचा वापर करून आपले अस्तित्व लपवत होता महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी त्याच्यावर १५ गुन्हे असून बऱ्याच गुन्ह्यात तो वॉन्टेड आहे. २० फेब्रुवारीला आरोपीबाबत मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. तांत्रिक बाबींची मदत घेऊन अस्तित्व लपवत होता. यासंदर्भात पाच पथके निर्माण केली होती. आरोपी महाराष्ट्रातून शिर्डीत, शिर्डीतून बारडोली येथे रवाना झाला होता. त्याप्रमाणे तीन पथके गुजरातला पाठविण्यात आली. गुन्हे शाखेची सूरत पोलिस, सूरत ग्रामीण पोलिस गोध्रा बडोदा पोलिसांशी समन्वय करून सदर ऑपरेशन राबवले. ७२ तास पोलिसांना गुजरातमध्ये चकवा देत होता. बारडोली येथे पोलिसांनी सापळा रचला तेथून तो निसटला. सूरतला गेला त्याठिकाणीही सापळा रचला तिथूनही तो पळाला. कोडदरा, भरूच बडोदरा मार्गे तो गोध्रा येथे पळून जात असताना ७२ तासांच्या पाठलागानंतर रात्री पावणे बाराला त्याला नाकाबंदी करून कलोल या गोध्राच्या जवळच्या ठिकाणी गुजरात पोलिसांच्या मदतीने पकडले.

हे ही वाचा:

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर

आरोपीच्या जवळचा मोबाईल, इंटरनेट संसाधने, कार जप्त केलेली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. यात कार वापरली ती महाराष्ट्रातील आहे. सदर आरोपी लोकेशन लपविण्यात तरबेज आहे. त्यामुळे पोलिसांना अटक करता आव्हाने आली, पण मुंबई पलिस दलाच्या अधिकारी तांत्रिक कौशल्ये या मदतीने त्याला अटक केली, असेही पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिस म्हणाले की, मलबार पोलिस ठाण्याकडे जयसिंघानीला आज सोपविण्यात येईल. त्याच्या सहकाऱ्यांनाही मलबारच्या ताब्यात देण्यात येईल. गुन्हे शाखा तांत्रिक तपासात वाकबगार आहे.  ७२ तासात आरोपी हा तांत्रिक व गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून पकडले. त्याच्यासोबत एक चालक व नातेवाईक यांना ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटक करण्यापुरते ही मोहीम होती, पुढील तपास मलबार हिल ठाणे करील. गुजरातमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याचे वास्तव्य होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा