अनिल देशमुखांच्या कोठडीतला मुक्काम आणखी वाढला

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल देशमुखांच्या कोठडीतला मुक्काम आणखी वाढला

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यात आला आहे.

१०० कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ केली असून त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १४ दिवसांची कोठडी अनिल देशमुखांना सुनावण्यात आली आहे.

ईडी विशेष कोर्टात आज अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी अनिल देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी पत्र लिहून केला होता.

Exit mobile version