26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाईडीला चकविण्याचा अनिल देशमुखांचा आणखी एक प्रयत्न

ईडीला चकविण्याचा अनिल देशमुखांचा आणखी एक प्रयत्न

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चकविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने बोलावणे पाठवले होते, पण त्यावेळी त्यांनी उपस्थित न राहण्याचे ठरविले. आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना बोलावणे धाडल्यावर नवे कारण पुढे करत देशमुख यांनी ईडीला सामोरे जाणे टाळले आहे. ईडीला दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, मी ७२ वर्षांचा आहे आणि मला उच्च रक्तदाब तसेच हृदयविकाराचा त्रासही आहे. तुम्ही माझ्या घरी तपासणीसाठी आलेला असताना मी २५ जूनच्या दिवशी आपल्याशी दीर्घ संवाद साधला आहेच. त्यामुळे आजच आपली भेट घेतली पाहिजे असे मला वाटत नाही. मी माझा अधिकृत प्रतिनिधी आपल्यापाशी पाठवत आहे.

या प्रकरणात आवश्यक असलेली कोणती कागदपत्रे हवीत त्याची माहिती मला देण्यात आली की, मी सर्व माहिती व कागदपत्रे आपल्याला पोचती करेन. ईडीने जी चौकशीची नोटीस देशमुख यांना पाठवली आहे, त्यात प्रत्यक्ष भेटण्यामागील कारण देण्यात आलेले नाही, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचा :

‘हा’ अपमान पुणेकर लक्षात ठेवतील

ठाकरे सरकारच्या निर्णयावर व्यापारी वर्ग संतापला!

चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या अंगाने सीबीआयने तपास सुरू केला आहे. त्याच धर्तीवर आता ईडीनेही आपल्या तपासाची दिशा ठरविली आहे. पोलिस आयुक्त म्हणून हटविण्यात आल्यानंतर हे पत्र परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ईडीनेही आपला मोर्चा देशमुख यांच्याकडे वळविला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा