महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगची यादी अनिल परब यांच्याकडून येत असे आणि तीच अतिरिक्त सचिवांना दिली जात असे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच रंगणार आहे.
अनिल देशमुख यांनी या जबाबात म्हटले आहे की, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त सचिवांना दिली जात असे. ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्याकडे एक कॅबिनेट मंत्र्याने लिस्ट दिल्याचा उल्लेख होता. ही लिस्ट अनिल परब यांच्याकडून दिली जात असल्याचे देशमुख यांनी जबाबात म्हटले आहे.ही लिस्ट अंतिम नव्हती. ही लिस्ट मी एसीएस होमला पाठवलि होती. या लिस्टच्या अनुसार पोस्टिंग द्या, असे म्हटले होते. अनिल परब हे त्यांना लिस्ट द्यायचे, अधिकाऱ्यांना कुठे पोस्टिंग द्यायची हे ठरायचे. शिवसेनेतील आपल्या आवडत्या अधिकाऱ्यांची निवड करून आपल्याडे पाठवायचे असा देशमुख यांचा दावा आहे.
हे ही वाचा:
नितेश राणे शरण; पोलिसांनी केली कोठडीची मागणी
पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक; पुढे कोण?
‘परमबीर सिंगच अँटिलिया स्फोटके प्रकरणात मास्टरमाईंड’
‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला
याआधी, माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यानी जबाब दिला होता की, तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवत असत. सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे खळबळ उडाली होती. आता देशमुख यांनी अनिल परब यांचे नाव पुढे केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
बदल्यांसंदर्भातील यादी मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली ती. या यादीनुसार बदली करावी व नियमात बसत असेल तरच करा.