अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; पुन्हा कोठडीत वाढ

न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; पुन्हा कोठडीत वाढ

भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने १४ दिवसांची वाढ केली आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे, त्यामुळेच आज विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला तरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा वेगळा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरेसे पुरावे असल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयच्या वकिलाने हायकोर्टात सादर केले आहे. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळेच आज विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

हे ही वाचा :

क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!

विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

वास्तविक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

Exit mobile version