गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात केलेले आरोप हे गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना याप्रकरणी “तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत?” असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती. सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय. सिंग यांच्यावतीने ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
हे ही वाचा:
ठाणे सत्र न्यायालयाचा एटीएसला दणका
पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले
पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत
अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये महिना खंडणी सचिन वाझेकडे मागितल्याची माहिती परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पात्रातून दिली होती.