अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

अनिल देशमुख्यांच्या जामीनाला स्थगिती

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

भ्रष्टचार आणि शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असेलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, सीबीआय त्यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सुटकेवर टांगती तलवार आहे.

अनिल देशमुख यांना न्यायालायने ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी देशमुख यांना जामीन मिळाला होता. परंतु, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांना तुरुंगातचं राहावे लागले होते. आता उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मंजूर केल्यामुळे त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु यामध्येही सीबीआय या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती आहे.

सीबीआयच्या या आव्हानामुळे दहा दिवस अनिल देशमुख यांना तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची सुटका होणार की नाही याचा निर्णय होणार आहे. अनिल देशमुख यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर आणि काही अटीशर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर अनिल देशमुख यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही. त्यांचा पासपोर्ट देखील जमा केला जणार आहे. तसेच दर बुधवारी त्यांना न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. मात्र अद्याप त्यांच्या जमीनावर टांगती तलवार आहे.

हे ही वाचा : 

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘या’ नेत्याचं नाव

गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात ठरले ‘लोकप्रिय’

सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून अनिल देखमुख हे तुरुंगात आहेत. तसेच ते हृदयविकाराने त्रस्त असल्याने खासगी रुग्णालयात उपचार करायला मिळावेत, अशी मागणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version