अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण तुरुंगवासातून सुटका नाहीच

उच्च न्यायालयाचा निर्णय

अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण तुरुंगवासातून सुटका नाहीच

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांना आज जामीन मंजूर झाला आहे. मात्र, हा जामीन ईडीकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नाही.

अनिल देशमुख हे जवळपास ११ महिने तुरुंगात आहेत. १०० कोटींच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर करण्यात आला होता. अनिल देशमुख यांचा १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.

सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.

हे ही वाचा:

नवरात्री २०२२ : विशालाक्षी शक्तीपीठ

उद्धव ठाकरे ‘या’ प्रश्नांची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील का?

अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी पत्र लिहून केला होता.

Exit mobile version