मुंबई-अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना मंगळवारी ईडीने बजावलेल्या समन्स नंतर देखील बुधवारी दोघेही ईडी कार्यालयात हजर राहिले नाही. देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंह हे आज ईडीच्या कार्यालयात हजर होऊन त्यांनी ईडीने पाठवलेल्या समन्सला उत्तर दिले असल्याचे वकील इंद्रजित सिंह यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांना ईडीने बुधवारी बजावलेले हे पाचवे समन्स होते, आम्ही ईडीला पूर्णपणे सहकार्य करत आहोत, आमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे असेही वकील इंद्रजित सिंह यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतलेली असतांनाच, ईडीकडून वारंवार समन्स का पाठवले जात आहे,हे कळत नाही ? असे इंद्रजीत सिंह यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात असतांना अटकपूर्व जामिनासाठी जाण्याचा प्रश्नच येत नाही असे ही सिंह म्हणाले. पाठवलेल्या समन्स बाबत आम्ही ईडीला उत्तर दिलेले असल्याचे अनिल देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंह यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर निर्णय दिल्यानंतर ईडीने मनी लॉनदरिंगच्या प्रकरणात अनिल देशमुख आणि त्यांचे मुलगा ऋषीकेश देशमुख यांना मंगळवारी समन्स बजावले होते, अनिल देशमुख यांना बजावण्यात आलेले हे पाचवे समन्स आहे. या समन्स मध्येअनिल देशमुख आणि ऋषीकेश देशमुख यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते. मात्र दोघेही बुधवारी ईडी कार्यालयात हजर न राहता त्यांचे वकील इंद्रजित सिंह यांनी ईडीचे अधिकारी यांची भेट घेऊन अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे हजर न राहण्याचे कारण दिले आहे.