महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासह माजी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना सीबीआयची कोठडी देण्यात आली आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी देशमुख यांना सीबीआयची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने ३१ मार्चला ईडीकडे अर्ज करून अनिल देशमुख, त्यांचे खासगी सचिव कुंदन शिंदे व सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने ५ एप्रिल २०२१ला अनिल देशमुख यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने पावले उचलली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझेला सांगून बार आणि रेस्तराँकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देशमुख देत असत असा आरोप परमबीर यांनी केला होता.
त्यानंतर देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ला ईडीने अटक केली आणि सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. वाझेला १३ मार्चला अटक करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात वाझे तुरुंगात आहे. सध्या तो तळोजा येथील तुरुंगात आहे.
हे ही वाचा:
‘ऑनलाईन ज्ञान घेऊन ते जीवनात वापरायला हवं’
सतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी
मेट्रोचे श्रेय फडणवीसांना मिळण्याची ठाकरे सरकारला भीती? निमंत्रण पत्रिकेत नाव नाही
रशिया युक्रेन युद्धाचा भारताला होणार दुहेरी फायदा
देशमुख यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय ८ एप्रिल रोजी सुनावणी घेईल. देशमुख यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, मनी लॉन्ड्रिंग आणि खंडणीचे जे आरोप आपल्यावर करण्यात आले आहेत, ते ज्यांच्यावर विविध आरोप आहेत त्यांच्या वक्तव्यांच्या आधारावर ही बातमी देण्यात आली आहे. १८ जानेवारीला पीएमएलए न्यायालयाने देशमुख यांची याचिका रद्द केली. ती रद्द करताना न्यायालयाने म्हटले की, देशमुख यांच्याविरोधात पुरेसे आहेत.