बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत लैंगिक अत्याचार प्रकरणावरून पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, शाळेने माफीनामा जाहीर केला असून याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. तर, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणावरून मंगळवार, २० ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी आणि स्थानिकांनी शाळेच्या गेटवर जमण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या गेटवर पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून घोषणाबाजी केली जात आहे. तर, या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दुसरीकडे संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. संतप्त नागरिकांनी न्यायाची मागणी केली असून रेल्वे रोखून ठेवल्या आहेत. यामुळे बदलापूरहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी शहरात बंदचीही हाक दिली आहे. त्यामुळे मंगळवार सकाळपासून बदलापूरमध्ये रस्त्यांवर तुरळक वाहने दिसत आहेत.
VIDEO | People gather in huge number demanding justice after a school sweeper in Maharashtra's Badlapur was arrested for assaulting two young girls. Here's what DCP Sudhakar Pathare said:
(Full video available on PTI Videos – https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/of9gvxlMuX
— Press Trust of India (@PTI_News) August 20, 2024
दरम्यान, स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !
लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?
चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !
कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर
बदलापूरच्या शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारप्रकरणी सोमवार, १९ ऑगस्ट कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करीत होता. तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर कारवाई केली असून त्यांची तत्काळ बदली केली आहे. तर, शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना बडतर्फ केले आहे.