शेट्टी बहिणींना आणि त्यांच्या आईला न्यायालयाचे समन्स

शेट्टी बहिणींना आणि त्यांच्या आईला न्यायालयाचे समन्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टी- कुंद्रा, तिची बहिण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील अंधेरी न्यायालयाने शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. तसेच न्यायालयाने तिघांनाही २८ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील अंधेरी न्यायालयाने एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले आहे. यांनी २१ लाखांचे कर्ज फेडले नसल्याचा आरोप व्यावसायिकाने केला असून व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने तिघींना २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

Tata IPL 2022 Mega Auction: लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काय होणार?

Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी

शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी २०१७ मध्ये व्याजासह द्यायचे होते, असा दावा व्यावसायिकाने केला आहे. त्यांच्या वडिलांनी वार्षिक १८ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. तसेच या कर्जाबद्दल त्यांनी आपल्या मुलींना आणि पत्नीला सांगितले होते, असा फिर्यादीचा दावा आहे. मात्र, कर्ज फेडण्याआधीच ११ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला.

Exit mobile version