आपल्या आजूबाजूला चोरीच्या घटना घडत असतात. कधी दागिन्यांची चोरी होते तर कधी रोखीची चोरी. कांदिवली शहरातील विविध ठिकाणांहून ५ ऑटोरिक्षा चोरण्यात आल्याची घटना घडली. त्या चोराला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे.
या रिक्षांची किंमत किमान तीन लाख १५ हजार रुपये होती. त्यांनी यापैकी एक रिक्षा कांदिवली पूर्वेतून, एक वाकोला आणि एक मालाड पूर्वेतून चोरी केली होती. अर्शद शेख उर्फ कल्लू असे आरोपीचे नाव आहे. तो अनेकदा शहरातील रिक्षांना नजर ठेवत असे. वेळ बघून तो झटकन ती रिक्षा चोरून न्यायचा. तो या रिक्षा शहराबाहेर नेऊन तिथे वापरायचा. कुठलीही रिक्षा बिघडली तर ती तो जागेच सोडून द्यायचा . चोरीच्या काही रिक्षा वसई आणि नालासोपारा येथे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’
राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका
बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं
घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार
विशेष म्हणजे शेखला दीड वर्षापूर्वी ९ रिक्षा चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आणि आता त्याला ५ रिक्षा चोरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अद्याप त्यास काय शिक्षा होईल हे समोर आलेले नाही. असाच एक प्रकार गोरेगाव मध्येही घडला आहे. तेथे एका ३० वर्षीय तरुणाने अनेक मोटारसायकल चोरल्या. आरोपी मनीष मिश्रा हा ओबेरॉय मॉलजवळील फुटपाथवर राहतो. तो फूटपाथ जवळ पार्क केलेल्या बाईक्स चा अवती भोवती फेरी मारायचा. सीसीटीव्ही फुटेजमुळे तो पकडला गेला. पोलिसांनी त्याची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.