…आणि अखेर हिंदु मुलगी-मुस्लिम युवकाचा विवाह रद्द झाला

…आणि अखेर हिंदु मुलगी-मुस्लिम युवकाचा विवाह रद्द झाला

लव्ह जिहादच्या नावाखाली सध्या हिंदू मुलींना फसवून लग्न करणे, किंवा धर्मांतरण करणे या गोष्टी वेगाने पसरत आहेत. घटनांची पाळंमुळं लक्षात घेता वेळीच सावध होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी एक घटना घडली. समाजातून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि लोकांनी इशारा दिल्यानंतर अखेर नाशिक जिल्ह्यातील हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलाचे लग्न अखेर रद्द झाले. या लग्नाची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे लग्न रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रसिका आडगावकर हिचे १८ जुलैला आसिफ खानसोबत नाशिक शहरातील तिडके भागात लग्न होणार होते. त्यासाठी लग्न पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या आंतर-धार्मिक विवाहावर मुलीच्या आजूबाजूच्या लोकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुलीचे वडील प्रकाश आडगावकर यांनी श्री संत नरहरी महाराज बालक सुवर्णकर संस्था नाशिक यांना पत्र लिहून म्हटले आहे की, मी माझ्या मुलीच्या रसिकाचे लग्न रद्द केले आहे.

हे ही वाचा :

लोकसंख्येबाबतच्या योगींच्या कायद्याला पवारांचा पाठिंबा; आता इतर पक्षांचे काय?

आता शिवसेनेची ‘ख्रिस्ती आघाडी’

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

श्री संत नरहरी महाराज बाल सुवर्णकर संस्था नाशिक, अहिर सुवर्णकार समाज संस्था नाशिक, नाशिक सराफ असोसिएशन ओबीसी आंदोलन समिती आणि विशेषत: विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन, हिंदु राष्ट्र सेना आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी युवा संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. मुलीच्या वडिलांचे स्पष्टीकरण देण्यात आले ज्यानंतर लग्न रद्द केले गेले.

लव्ह जिहादच्या नावाखाली प्रेम करून लग्न करून अनेक हिंदु मुलींना फसविण्यात येत आहे. त्यामुळेच मुस्लिम युवकांचे फावत आहे. धर्मांतरणाची लाट सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. हिरवे संकट हळूहळू का होईना आपल्या सभोवती घोंगावू लागलेले आहे. त्यामुळे सावधगिरीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

Exit mobile version