आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडे ही सध्या एनसीबीच्या रडारवर आहे. सध्या गेले दोन दिवस अनन्या हिची चौकशी झाली असून या चौकशीदरम्यान अनन्याने आपण आर्यन खानला ड्रग्स पुरवले असल्याची कबुली दिली आहे. पण आपण कोणत्याही ड्रग्स पेडलरच्या म्हणजेच ड्रग्स पुरवठादाराच्या संपर्कात नाही आहोत असा दावा अनन्या पांडे हिने केला आहे. एनसीबीच्या चौकशीमध्ये अनन्या पांडेने ही बाब उघड केली आहे.
आर्यन खानच्या सांगण्यावरून अनन्या पांडे हिने त्यांच्या एका प्रभावशाली मित्राच्या माध्यमातून वीड म्हणजेच गांजा प्राप्त केला. एक-दोन वेळेस या मित्राच्या माध्यमातून हा गांजा त्यांना प्राप्त झाला. त्या मित्राने त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत हा गांजा पाठवला होता. जो अनन्याने तिच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वीकारला. नंतर जेव्हा ती आर्यनला भेटली तेव्हा तिने हा गांजा आर्यनकडे दिला याचा खुलासा त्यांच्या चॅट मधून होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान
अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर
संघाची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार? फौजदारी तक्रार दाखल
दरम्यान एनसीबीने या सर्व प्रकरणात संबंधित कर्मचार्यांचीही चौकशी केल्याचे समोर आले आहे. अनन्याच्या व्हॉट्सऍप स्टेट्समध्ये ज्या व्यक्तीचा वीड पाठवणारा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे त्या कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात आली आहे. तर सध्या त्याचा फोन जप्त केला आहे.
दरम्यान अनन्या पांडे हिच्या चौकशीच्या दुसऱ्या दिवशी तिला एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी चांगलेच झापले असल्याची माहिती समोर येत आहे. अनन्या चौकशीला वेळेत न आल्यामुळे तिला वानखेडेंनी तंबी दिल्याचे समजते.