शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावर तसेच त्यांच्या जावयावर आता ईडीने कारवाई सुरु केलेली आहे. ईडीने त्यांच्या निवासस्थानाची तसेच कार्यालयाची झाडझडती सुरु झालेली आहे. अमरावतीमध्ये गुरुवारी दिवसभर ईडीच्या कारवाईची चर्चा होती.
मुंबई येथील सिटी बॅंकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी बॅंकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच बुधवारी अडसुळांसह माजी आमदार तथा बॅंकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे व कार्यालयाची झाडाझडती घेतली. मात्र सायंकाळी आनंदराव अडसूळ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून असं काहीही झालेलं नसल्याचं सांगत आहेत.
आनंदराव अडसूळ यांनी ईडी चौकशीबाबत होत असलेल्या चर्चेचं खापर आमदार रवी राणा यांच्यावर फोडलं आहे. ‘रवी राणा याला माहीत झालं आहे की कोर्टाचा निर्णय विरोधात आल्यामुळे त्याच्या पत्नीची खासदारकी जाणार आहे. तसंच स्वत: रवी राणा यांच्याविरोधातही एका प्रकरणात कोर्टात केस सुरू असून त्या प्रकरणाचा निकालही राणा यांच्याविरोधात जाणार आहे. या सगळ्यामुळे उद्विग्न झालेल्या रवी राणा यानी चौकशीच्या बातम्या छापून आणल्या,’ असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला.
हे ही वाचा:
‘काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’
लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की
गुणवत्ता आणि प्रतिभेला सामावून घेण्यासाठी उद्योगांत स्पर्धा
प्रकल्पाच्या माहितीवर पालिकेची मगर’मिठी’
अडसूळ यांनी त्यांच्यावर झालेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. ‘ईडी आणि सहकार खात्याच्या चौकशीत माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असं म्हणत अडसूळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी ईडी चौकशीची चर्चा फेटाळली असली तरीही सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावलं जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.