भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात आज १६ फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्काद्यक वृत्त समोर आले आहे. या अज्ञात व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलीस या अज्ञात व्यक्तीची चौकशी करत आहेत.
या घटनेमुळे अजित डोभाल यांच्या निवसस्थानाजवळ गोंधळ निर्माण झाला. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती चौकशीत असंबंध वक्तव्ये करत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा व्यक्ती मानसिक रोगी वाटत आहे. तो एक भाड्याची गाडी चावलत होता. त्याला अजित डोभाल यांना भेटायचे असल्याचे तो वारंवार सांगत होता. तेच त्याची अडचण सोडवू शकतील असेही त्याने सांगितले. ताब्यात घेण्यात आलेला हा व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुमधील राहणारा आहे.
अजित डोभाल हे दिल्लीतील ल्युटियन्स झोनमधील ५ जनपथ बंगल्यात राहतात. त्यांच्या आधी या बंगल्यात माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल रहात होते. त्यांच्या बंगल्याशेजारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा बंगला आहे.
हे ही वाचा:
मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!
‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’
भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?
‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’
अजित डोभाल हे १९७२ सालचे आयबी अधिकारी आहेत. भारतीय गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक बड्या कारवाया केल्या आहेत. तब्बल सात वर्ष ते पाकिस्तानमध्ये राहिले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यात अजित डोभाल यांची महत्त्वाची भूमिका होती. पुलवामा हल्ल्यानंतर अजित डोवाल यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृ्त्तावखाली भारताने २६ फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता.