छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात एक अधिकारी शहीद, जवान जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात एक अधिकारी शहीद, जवान जखमी

छत्तीसगडमधील अतिसंवेदनशील नारायणपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोटात एक जवान शहीद झाला. तर एक जवान जखमी झाला. रस्ता बांधकामाच्या सुरक्षेसाठी जवान बाहेर पडले होते. त्यानंतर हा स्फोट झाला. शहीद आणि जखमी हे ITBP 53 बटालियनचे जवान आहेत. सोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंडरीबेडाजवळ नक्षलवाद्यांनी हा आयईडी प्लांट लावला होता. नारायणपूरचे एसपी सदानंद कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITBP 53 बटालियनचे जवान रस्त्याच्या बांधकामाच्या संरक्षणासाठी बाहेर पडले होते. सोनपूर पोलीस ठाण्याच्या धोंडरीबेडाजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. राजेंद्र सिंह असे शहीद जवानाचे नाव सांगण्यात येत आहे. तर जखमी झालेल्या जवानाचे महेश असे नाव आहे. जखमी जवानाला जंगलातून रुग्णालयात तात्काळ दाखल केले आहे. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत. त्या परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.

सुकमा जिल्ह्यात रविवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये डीआरजीचे तीन जवान जखमी झाले होते. जखमी जवानांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांनाही गोळ्या घालण्यात आल्याचा दावा पोलीस अधिकारी करत आहेत.

हे ही वाचा:

फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू  

केरळपाल भागातील चिचोरगुडाजवळ नक्षलवाद्यांचा मोठा जमाव असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर डीआरजी जवानांना पाठवण्यात आले. घुसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यात डीआरजी जवान सोमारू राम पोयाम, नेहरू कश्यप आणि वेट्टी देवा जखमी झाले आहेत. मात्र सर्व जवानांची प्रकृती स्थिर आहे.

Exit mobile version