देशभरात बांगलादेशी रोहिग्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शोधून त्यांना माघारी पाठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच शनिवारी दिल्ली पोलिसांनी एका पडताळणी मोहिमेदरम्यान एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. हा व्यक्ती दिल्लीच्या दक्षिण पश्चिम जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मोहम्मद साहिदुल इस्लाम असे या आरोपीचे नाव असून, त्याला पालम गाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केल्यानंतर त्याला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमार्फत (FRRO) बांगलादेशला हद्दपार करण्यासाठी सुपूर्द केले.
Delhi: Bangladeshi national residing illegally for 3 years arrested, deported
Read @ANI Story | https://t.co/vlb1hqD6r4#Delhi #Bangladesh #Illegal #Arrest pic.twitter.com/A4pmrYHPRO
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपी वैध कागदपत्रे सादर करू शकला नाही आणि त्याने अवैध स्थलांतरित असल्याचे कबूल केले. त्याच्याकडे बांगलादेशातील छायाप्रत कागदपत्रे असल्याचेही आढळून आले. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्या आदेशानंतर बांगलादेशातील ‘बेकायदेशीर स्थलांतरित’ ओळखण्यासाठी पडताळणी मोहीम राबवण्यात आली, असे विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मधुप तिवारी यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारीही दिल्ली पोलिसांनी पाच बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे स्थलांतर केल्याची कबुली दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बांगलादेशातील पाच बेकायदेशीर स्थलांतरितांना काली बस्ती, उत्तम नगर मेट्रो स्टेशनजवळ, पीएस उत्तम नगरच्या हद्दीत अटक केली. तपासात त्यांचे बांगलादेशचे नागरिकत्व आणि मोबाईल फोन नंबर उघड झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींना आरके पुरम येथील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या (FRRO) कार्यालयात नेण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना इंद्रलोक केंद्रात ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा..
छत्तीसगडमधील अबुझमाडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा
भाजपाचे उद्या राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी
ग्रामीण भारत महोत्सव विकासयात्रेची झलक
यापूर्वी, राजधानीमध्ये दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या बेकायदेशीर इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श केला होता. तसेच या प्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. बनावट वेबसाइट तयार करणे, बनावट कागदपत्रे आणि बनावट आधार कार्ड बनवणे अशी कामे करणारे आणि तंत्रज्ञान तज्ञांचा या अटक केलेल्यांमध्ये समावेश होता. हे लोक बांगलादेशी नागरिकांना बनावट वेबसाइटद्वारे बनावट आयडी वापरून सुविधा देत होते.