चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

पोलिसांकडून स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कालबच्या काही काचा फुटल्या आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून बॉम्ब शोधक पथक आणि चंदीगड फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकही नमुने गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चंदीगडच्या सेक्टर- २६ येथील दोन क्लबबाहेर सोमवारी रात्री उशिरा म्हणजेच मध्यरात्री सुमारे २.३० ते २.४५ च्या दरम्यान स्फोट झाले. दोन्ही ठिकाणी स्फोट झाल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर एसएसपीसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या स्फोटांमुळे क्लबच्या काचा फुटल्या असून जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २.३० ते २.४५ च्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी एका खाजगी क्लबमध्ये कमी तीव्रतेचे स्फोटक फेकले. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, स्फोटामुळे अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काही किरकोळ नुकसान झाले आहे. जवळच्या एका क्लबचेही किरकोळ नुकसान झाले.

हे ही वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना!

ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर २ आमदार शिल्लक राहतील उर्वरित इकडे येतील!

जलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर, चंदीगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला. बॉम्ब शोधक पथक आणि चंदीगड फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकही नमुने गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version