29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामामालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न

मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न

करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण आणि धर्म परिवर्तनाचे धडे

Google News Follow

Related

करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली एका संस्थेकडून धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपाची दखल गांभीर्याने घेतली असून संबंधित संस्थेवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण आणि धर्म परिवर्तनाचे धडे दिले जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी मसगा येथील कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. मालेगावच्या मसगा महाविद्यालयात पुण्याच्या ‘सत्य मलिक लोक सेवा ग्रुप’ कडून भारतीय छात्र सेना (NCC) यांच्यातर्फे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्यांनी प्रथम कुराणमधील कलमा पढवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह व्याख्यात्यांनाही ताब्यात घेतलं. मात्र, पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात सुमारे दोन तास ठाण मांडत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

हे ही वाचा:

भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले

शरद पवार धमकी प्रकरणी एका इंजिनिअरला अटक

मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी

इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले

या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रमांचे आयोजन करताना व्यवस्थापनाची परवानगी न घेतल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत कार्यक्रमांचे आयोजक आणि व्याख्याते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा