गुजरातमधील जुनागढ येथील एक दर्गा हटवण्यासाठी जुनागढ महापालिकेने दिलेल्या नोटीसवरून गदारोळ झाला. आहे. या पार्श्वभूमीवर रात्री हल्लेखोरांनी माजेवाडी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. ज्यामध्ये डीएसपी दर्जाचे अधिकारी, पीएसआय आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. माजेवाडी दरवाजाजवळ बांधलेला दर्गा पाच दिवसांत हटवून त्याची वैध कागदपत्रे दाखवण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मुस्लीम समाज संतप्त झाला असून प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दर्गा हटवण्याचा खर्च दर्गा समितीकडून वसूल केला जाईल, असेही नोटीसमध्ये म्हटले होते.
या घटनेनंतर जुनागढमध्ये हिंसाचारानंतर तणावाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या अनेक तुकड्या येथे गस्त घालत आहेत. या घटनेनंतर १७४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत. त्याचवेळी या घटनेत एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दर्ग्यावर नोटीस लावण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजातील लोक संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अचानक ५००- ६०० लोक माजेवाडी पोलीस स्टेशनवर जमा झाले आणि त्यांनी हल्ला केला. यादरम्यान हल्लेखोरांनी सरकारी वाहनालाही आग लावली.
हे ही वाचा:
नाना पटोलेंविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे
पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला
मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला
जुनागढच्या एसपींनी सांगितले की, महापालिकेने दर्ग्याला पाच दिवसांत वैध कागदपत्रे दाखवण्यास सांगितले होते. मात्र कागदपत्रे दाखविण्याऐवजी लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी पोलिस आणि वाहनांवर दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.