26 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरक्राईमनामामुलाशी बोलते म्हणून पालकांनी आपल्या मुलीला ही दिली शिक्षा

मुलाशी बोलते म्हणून पालकांनी आपल्या मुलीला ही दिली शिक्षा

११ वर्षाच्या मुलगी वयाने १ वर्ष मोठा असलेल्या मुलाशी बोलायाची म्हणून पालकांनीच मुलीला कालव्यात ढकळून हत्या केली.

Google News Follow

Related

मेरठमध्ये एका जोडप्याने आपल्या मुलीला विचित्र कारणासाठी शिक्षा दिली. त्याच परिसरातील एका १२ वर्षांच्या मुलाशी ती बोलत असे.

या जोडप्याने आपल्या या ११ वर्षाच्या मुलीला कालव्यात फेकून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठार मारण्याचे कारण म्हणजे,  ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली असून पोलिसांना अद्याप मृतदेह सापडलेला नाही. शनिवारी रात्री पालकांना अटक करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली.

कश्यप दाम्पत्यांची मुलगी चंचल बेपत्ता झाल्याचा दावा करत पालकांनी यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, जेव्हा पोलिस तिचा सहा वर्षांचा भाऊ आरव कश्यपशी बोलले तेव्हा त्याने सांगितले की, त्याचे पालक चंचलला जवळच्या बाजारात घेऊन गेले होते. परंतु ते परत आले तेव्हा ती त्यांच्यासोबत नव्हती. बबलू कश्यप (४०) आणि रुबी कश्यप (३८) या दाम्पत्याने सरधना परिसरातील भोले की ढालजवळील कालव्यात आपल्या मुलीला बुडवल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली.

मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून, मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके कालव्याजवळ तैनात करण्यात आली आहेत, त्याने १ सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती दिली की तो आणि त्याची पत्नी चंचलला बर्गर खाण्यासाठी स्थानिक बाजारात घेऊन गेले. बाजारातून त्यांची मुलगी गायब झाली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले पण मुलगी कुठेच दिसत नव्हती. मेरठच्या सर्कल ऑफिसर पूनम सिरोही म्हणाल्या, बबलू हा रिकव्हरी एजंट आहे.

हे ही वाचा:

‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

५० फुटावरून झुला खाली आदळला आणि

Cyrus Mistry Death : सीट बेल्ट न लावल्यामुळे सायरस मिस्त्रींचा घात झाला

मुलगा आरव ने संबंधित घटनेबद्दल पितळ उघडे पाडले असून, चौकशीअंती प्रश्नाच्या वेळी बबलू आणि त्याच्या पत्नीने परस्परविरोधी विधाने केली अशी माहिती सिरोही यांनी दिली. या प्रकरणात आयपीसी कलमांतर्गत ३०२ (हत्या) या आरोपा खाली अटक करण्यात आले आहे. कश्यप दाम्पत्याच्या मुलीने दुसऱ्या मुलासोबत खेळलेला आवडत नसल्याने कालव्यात टाकून हत्या केल्याची कबुली बबलूने दिली. बबलूला तुरुंगात पाठवण्यात आले, तर रुबी आजारी पडल्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा