अमृतपालचा शोध घेता घेता त्याची पत्नी सापडली पोलिसांच्या तावडीत !

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली.

अमृतपालचा शोध घेता घेता त्याची पत्नी सापडली पोलिसांच्या तावडीत !

खलिस्तानची मागणी करणाऱ्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून त्याला फरार घोषित केले आहे. फरार अमृतपाल सिंहच्या पत्नीला गुरुवारी अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली असून लंडनला जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर यांच्या विरोधात आतापर्यंत देशभरात एफआयआर दाखल नाही.किरणदीप कौर ब्रिटन स्तिथ असताना बब्बर खालसा इंटरनॅशनलची सदस्य आहे अशी कोणतीही माहिती पोलीस अथवा केंद्रीय एजन्सी जवळ नाही. किरणदीप कौरला कायदेशीर प्रक्रिये दरम्यान रोखण्यात आले असून फरार आरोपींच्या कुटुंबांची चौकशी केली जाते.

पंजाब पोलीसने ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांवर १८ मार्च रोजी कारवाई केली होती. या दरम्यान पोलिसांनी त्याच्या हजारो साथीदारांना आणि समर्थकांना अटक केली. मात्र या कारवाईत अमृतपाल थोड्या साथीदारांसोबत पलायन करण्यात यशस्वी झाला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

हे ही वाचा:

म्हणून महाराष्ट्र म्हणतोय, बरे झाले ठाकरे सरकार गेले…

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

कुत्र्यांनाही मिळाला स्थानिक अधिवासाचा हक्क, त्यांच्या परिसरातून हाकलता येणार नाही

अमृतपाल सिंहने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील एनआरआय किरणदीप कौरशी लग्न केले. लग्नानंतर किरणदीप अमृतपालसोबत त्याच्या गावी राहू लागली. किरणदीपला अटक केल्यानंतर नुकतीच पोलिसांनी तिची चौकशी केली असता ही चौकशी अमृतपालला विदेशातून मिळालेल्या फंडिंग झाली असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस तपासादरम्यान ३५ करोड रुपयांची फंडिंग अमृतपाल सिंहला मिळाली असे आढळून आले. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस या फंडिंग संबंधात अमृतपालच्या कुटुंबीय आणि जवळीक लोकांच्या बँक खात्याची चौकशी केली जात आहे. अमृतपाल सिंह यांनी परदेशातून पैसे खर्च करून स्वत:साठी आणि आपल्या लोकांसाठी नवीन एसयूव्ही खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Exit mobile version