खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. त्याचा शोध पंजाब पोलिस घेत आहेत पण अजूनही तो सापडलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर जालंधरमधील नांगल अंबियाँ या गावातील गुरुद्वारामधून तो पळाल्याचे स्पष्ट होते आहे. एएनआयने दिलेल्या माहितीवरून प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे की, १८ मार्च रोजी अमृतपाल आणि त्याचे काही साथीदार इथे होते. गुरुद्वारामध्ये त्याने कपडे बदलले, जेवण घेतले आणि नंतर तो मोटरसायकलने पळून गेला. या साक्षीदाराकडून पंजाब पोलिस माहिती घेत आहेत.
यासंदर्भातील एक फुटेज सध्या व्हायरल होत आहे पण पंजाब पोलिसांनी त्याची पुष्टी केलेली नाही. मात्र या सीसीटीव्ही फूटेजमध्ये वेगळ्या कपड्यात तो मोटारबाईकवरून पळताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. पण जेव्हा अमृतपाल प्रारंभी पळाला होता तो मारुती कारमधून पळाला होता. त्यानंतर तो नांगल अंबियाँ गावात थांबला आणि गुरुद्वारात काही काळ विश्रांती घेऊन नंतर त्याने कपडे बदलून पळ काढला.
हे ही वाचा:
वॉल स्ट्रीट जर्नल म्हणते की, भाजप जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष
क्रांतिकारक, कुशल संघटक, तत्वज्ञ, व्रतस्थ डॉ. हेडगेवार
रामदास कदम वाट कसली बघताय? उडवून द्या बार…
आनंद, समृद्धी घेऊन आला गुढीपाडवा!
दैनिक भास्करने दिलेल्या माहितीवरून अमृतपालने कपडे बदलले आणि राखाडी रंगाची पँट घातली. डोक्यावरील मुंडासेही त्याने काढले. नंतर तेथे त्याने गुलाबी रंगाची पगडी घातली. काळा गॉगल लावून तो मोटारबाईकवरून जाताना दिसला. या फूटेजमध्ये हेदेखील पाहायला मिळत आहे की, त्याने कृपाणही (छोटा खंजीर) सोबत बाळगलेला नाही. त्याने आपली दाढी कापून छोटी केल्याचाही दावा केला जात आहे. मात्र शिखांमध्ये अशी दाढी कापणे अनुचित मानले जाते. ज्या बाईकवरून तो पळाला त्या बाईकचा नंबर PB 08 CU 8884 असा असल्याचाही दावा केला जात आहे.
Punjab | We got to know today morning when the police came that Amritpal along with his associates was here in the village on Mar 18. He changed clothes at local gurudwara, had food&then went away on motorcycle. Babaji who's being questioned by police now had admitted that… pic.twitter.com/7YVgeUOsTq
— ANI (@ANI) March 21, 2023
पंजाबचे पोलिस महासंचालक सुखचैन सिंग यांनी म्हटले आहे की, अद्याप अमृतपालला अटक करण्यात आलेली नाही. त्याला पकडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच त्याला पकडले जाईल. इतर राज्यांकडून आणि केंद्रीय संस्थांकडून पंजाब पोलिसांना योग्य सहकार्य मिळते आहे. दरम्यान, त्याला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.