खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अजूनही फरार आहे. अमृतपालचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. अमृतपालला पकडण्यासाठी जाळे विणण्यात आले आहे. त्यासाठी त्याच्या जवळच्या साथीदारांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना स्वतंत्र कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर चोवीस तास सीसीटीव्हीची नजर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मंगळवारी अमृतपालचे काका हरजीत सिंगसह इतर तिघांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले आणि पंजाबपासून सुमारे २,५०० किमी अंतरावर असलेल्या दिब्रुगड येथे आणण्यात आले. अमृतपाल सिंगच्या काकाला दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. अमृतपालचे सात साथीदारही याच तुरुंगात आहेत. दलजीत कलसी, बसंत सिंग, गुरमीत सिंग भुकनवाला, भगवंत सिंग, कुलवंत सिंग धालीवाल आणि गुरिंदर पाल सिंग हे ‘वारीस पंजाब दे’चे इतर सहकारी तुरुंगात बंद आहेत. रासुका खाली अटक करण्यात आलेल्या बंदिवानांची सुरक्षा व्यवस्था इतर कैद्यांपेक्षा वेगळी आहे. या सात जणांना त्यांच्या सेलमध्ये बेड आणि गाद्या आणि टेलिव्हिजन सेटही देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
पोलीस महानिरीक्षक प्रशांत भुईया यांनी कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संपूर्ण कारागृह परिसराची सुरक्षा कडक करण्यात आली असून वारिस पंजाब दे संघटनेच्या सात सदस्यांच्या आरोग्याचीही नियमित तपासणी केली जात आहे. कारागृह परिसरात चार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तर इतर सर्व सदोष कॅमेरे बदलण्यात आले असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सीआरपीएफ, आसाम पोलीस आणि तुरुंग रक्षकांना अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच कारागृहाची संपूर्ण बाह्य हद्द सीसीटीव्हीने सुसज्ज करण्यात आली आहे.