दंडात्मक कारवाईतून वसूल केलेले पैसे पोलिसानेच लाटले

दंडात्मक कारवाईतून वसूल केलेले पैसे पोलिसानेच लाटले

कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी धाक दाखविला जातो, कधी दंड वसूल केला जातो, पण त्या दंडाची रक्कमच जर पोलिसांनी लाटली तर…असे मुंबईत मात्र घडले. मुंबईकराकडून दंडात्मक कारवाई करून वसूल केलेल्या २१ लाख रुपये पोलिसानेच लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अनधिकृत फेरीवाले, विनामस्क फिरणारे लोक आणि इतर कारवाईदरम्यान दंड म्हणून वसूल केलेलं पैसे न्यायालयात न जमा करता कामासाठी नेमलेल्या पोलीस कारकुनाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. घाटकोपर पोलीस ठाण्यातला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, मात्र ज्या पोलीस शिपाई कारकुनाने हे पैसे लाटले त्याचाच ८ महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याने हा भरणा कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविरोधात बोलणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

गेल्या २ वर्षांच्या काळात एकूण २८ लाख रुपये कारवाईरम्यान जमा झाले होते. मात्र त्यापैकी फक्त ७ लाख रुपये न्यायालयात जमा करण्यात आले उरलेले २१ लाख या पोलीस कारकुनाने स्वतःसाठी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. पण आता तो कारकुन मृत्युमुखी पडल्याने पोलिसांच्याही हातात काही राहिलेले नाही. ज्याने पैशांचा अपहार केला त्याचाच मृत्यू झाल्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात या मयत पोलीस शिपायावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरतर दंडात्मक कारवाई करून जे पैसे जमा झालेत त्याची वेळोवेळी माहिती घेऊन वरिष्ठांपर्यंत देणे किंवा ते न्यायालयात व्यवस्थित जमा होत आहेत की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षक(प्रशासन) यांची असते मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आले. घाटकोपर पोलीस या प्रकरणाचा अधीक तपास करत आहेत..

Exit mobile version