केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत शनिवारी (२० जुलै) मोठी त्रुटी समोर आली. भाजपच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झारखंडच्या रांची येथे पोहोचलेल्या अमित शाह यांच्या ताफ्याचा काही लोकांनी पाठलाग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हे लोक दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हटियाचे डीएसपी प्रमोद कुमार मिश्रा म्हणाले की, हे लोक ताफ्यात प्रवेश करू शकले नाहीत. हे लोक वेगाने दुचाकी चालवत ताफ्याचा पाठलाग करत होते. हे लोक दारूच्या नशेत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. भाजपच्या विस्तृत कार्यसमितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रांचीला पोहोचले होते. बिरसा मुंडा विमानतळावरून त्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी रवाना झाला तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ताफ्यात प्रवेश केला. मात्र, दोन्ही तरुणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली.
हे ही वाचा..
न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !
इलॉन मस्क यांच्याकडून मोदींना कोटी कोटी शुभेच्छा…१० कोटी फॉलोअर झाल्याबद्दल अभिनंदन !
यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !
हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब
एएनआयशी बोलताना डीएसपींनी अटक केलेल्या तरुणाला संपूर्ण प्रकरण सांगण्यास सांगितले. त्यावर दोन्ही तरुणांनी दारूच्या नशेत असल्याची कबुली दिली. कोणाचा ताफा जात आहे याची आम्हाला माहिती न्हवती, तसेच आम्ही गुन्हेगार नाही आहोत, असे अटक करण्यात आलेल्या तरुणांनी सांगितले. अंकित आणि मोहित असे अटक कारण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, सध्यातरी सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे दिसत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.