अमित शाह, योगी आदित्यनाथ लष्कर-ए-तोयबाच्या हिट लिस्टवर

अमित शाह, योगी आदित्यनाथ लष्कर-ए-तोयबाच्या हिट लिस्टवर

सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. मेलमध्ये सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आणि विमानतळांवर अनेक बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवालाही धोका असल्याचं मेलमध्ये म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयाला ४ ते ५ दिवसांपूर्वी ईमेल आल्याची माहिती आहे. सीआरपीएफच्या धोका व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून हे मेल तपास यंत्रणा एनआयएसह इतर गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले आहेत. हा मेल मिळाल्यानंतर तपास यंत्रणा ईमेलच्या स्त्रोत आणि षडयंत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट गडद

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

तिसरी विकेट कोणाची?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

भारतात लष्कर-ए-तोयबाचे ११ पेक्षा जास्त दहशतवादी आणि आत्मघाती हल्लेखोर सक्रिय असल्याचेही ईमेलमध्ये नमूद केले आहे. तीन राज्यात २०० किलो हायग्रेड आरडीएक्स असल्याचा मेलमध्ये उल्लेख आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवालाही धोका असल्याचं मेलमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनआयए कंट्रोल रुमवरही असाच फोन आला होता. कॉलरने पाकिस्तानच्या कराची शहरातून कॉल केल्याचा दावा केला होता. मुंबई बंदर आणि पोलिस आस्थापनांवर जैशच्या हल्ल्याच्या नियोजनाची माहिती दिली होती. या प्रकरणाची चौकशीही सध्या सुरू आहे.

Exit mobile version