अमेरिकन एअरलाईन्सच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीकडे येणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर या विमान प्रवासांत लघुशंका केल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिल्यामुळे आता सगळीकडे चर्चा होत आहे. उपलब्ध माहितीनुसार अमेरिकेच्या एअरलाईन्स फ्लाईट क्रमांक एए २९२ या मध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजून १६ मिनिटांनी या विमानाने न्यूयॉर्क कडून उड्डाण केले त्यानंतर १४ तास २६ मिनिटांनी हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी उतरले.
ज्या प्रवाशांवर हे आरोप केले आहेत , तो अमेरिकेन विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याने दारूचे सेवन केले होते. म्हणूनच त्याने झोपेमध्ये सहप्रवाशावर लघुशंका केली. या घटनेबद्दल त्याची तक्रार प्रवाशाने दाखल केली होती. दरम्यान, या अमेरिकन विद्यार्थ्याने या घाणेरड्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. म्हणूनच त्या पीडित प्रवाशाने देखील आपला मोठेपणा दाखवत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
या तक्रारीमुळे त्याचे संपूर्ण करिअर खराब होण्याची शक्यताच जास्त होती, म्हणूनच तक्रार मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विमान कंपनीने ह्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आयजीआय विमानतळावरील एटीसी अर्थात , ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ यांना कळवल्याचे स्पष्ट केले आहे. एटीसीने कळविले आहे. सी आय एस एफ यांनी कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहे, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यांत दिले आहे.