मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !

अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील घटना

मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !

अंबरनाथच्या पालेगाव परिसरात मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.कोणाला समजू नये म्हणून आरोपींनी मृतदेह पाण्याच्या डबक्यात फेकून दिला.या प्रकरणी पोलिसांनी घटनेची तपासणी करत काही तासातच तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्याची तरुणपिढी मोबाईलमध्ये गुंतलेली असल्याचे सर्वत्र चित्र आहे. अन्न, पाणी, निवारा सोबत मोबाईल सुद्धा मानवाची मूलभूत गरज दिसून येते.आपल्या स्मार्टफोनला कोणी हात लावला तरी त्याचा राग सर्वांना येतो.पण अशा काही घटना आहेत ज्यामध्ये मोबाईल न दिल्याने मुलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.तशीच एक घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे.फक्त मोबाईल देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसी जवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकाम सुरू असताना मृत लालजी सहाय हा तरुण फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी शंभू मांझी हा तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र लालजी यांनी मोबाईल न दिल्याने शंभू याला राग आला आणि त्याने बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने लालजी यांच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.लालजी याची हत्या झाल्याने या मृतदेहाची कशी लावायची असा प्रश्न आरोपी शंभू याला पडला. त्यानंतर आरोपीने आपल्या मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोन मित्रांना बोलावले.

 

नंतर तिघांनी मिळून हा मृतदेह पालेगावजवळ पाण्याने भरलेल्या एका डबक्यात फेकून पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणात पोलिसांनी ४० संशयित जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या प्रकरणी तीन आरोपींची नावं समोर आली.त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक करण्यात आली आहे.या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी दिली आहे.

Exit mobile version