केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

एर्नाकुलम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

केरळमधील अलुवा येथे पाच वर्षांच्या चिमुरडीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या अश्फाक आलम याला एर्नाकुलम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने (महिला आणि मुलांवरील अत्याचार) मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पोक्सो कायदा आणि आयपीसीच्या पाच कलमांतर्गत आरोपी अश्फाकला पाच वेळा जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.यासह आरोपीला एकूण ७.२० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

आरोपी अश्फाक आलमला मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास न्यायालयात हजार केले असता न्यायालयाकडून त्याला शिक्षा सुनावण्यात आली.या खटल्यात विशेष सरकारी वकील जी मोहनराज यांनी काम पाहिले.आरोपीने २८ जुलै रोजी दुपारी ३च्या सुमारास अलुवा येथील एका पाच वर्षाच्या मुलीचे तिच्या घरापासून अपहरण केले होते.त्यानंतर आरोपीने त्याच दिवशी सायंकाळी ५:३० च्या सुमारास तिची हत्या केली.

हे ही वाचा:

अवकाशातील प्रकाशउत्सव… नासाकडून दिवाळी शुभेच्छा!

रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल, ८०६ जणांवर कारवाई

‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’

गर्दीमुळे डब्यात चढूच शकला नाही; रेल्वेकडे मागितले एसी तिकिटाचे संपूर्ण पैसे!

याप्रकरणी न्यायाधीश के सोमण यांनी ४ नोव्हेंबर आरोपीला दोषी ठरवले.जेव्हा कोर्टाने आरोपीच्या शिक्षेची सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी ठरवली तेव्हा फिर्यादीने आरोपीस मोठ्यात मोठी शिक्षा देण्याची मागणी केली.तथापि, बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपीचे वय २९ वर्ष असल्याचे सांगत न्यायालयाकडे सवलत मागितली. विशेष म्हणजे, न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी म्हणजे ‘बालदिनी’ आरोपी आलमला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version