25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

Google News Follow

Related

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जुबेर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSC युनिटने आयपीसी कलम १५३/२९५ अंतर्गत अटक केली आहे. जुबेर यांना पुरेशा पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे.

एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झुबेर यांनी एका विशिष्ट धर्माच्या दैवताचा अपमान करण्याच्या हेतूने एक आक्षेपार्ह फोटो ट्वीटरवर २०१८च्या मार्चमध्ये प्रसारित केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या IFSC या शाखेने त्यांना अटक केली. ट्वीटर खातेदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने, आयपीसी कलम १५३-ए (वेगवेगळय़ा समूहांमध्ये द्वेष पसरवणे) आणि २९५-ए (धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने द्वेषमूलक कृत्ये करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

“मोहम्मद जुबेर यांनी एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले फोटो आणि शब्द हे अत्यंत प्रक्षोभक असून लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी हेतुपुरस्सर आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते,” अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

याबाबत बोलताना अल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, “मोहम्मद जुबेर यांना 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे. तरीही काल संध्याकाळी त्यांना अन्य एका प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यामुळे अटक करण्यात आली आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा