27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामादहशतीचा, अत्याचारांचा अध्याय संपुष्टात आला!

दहशतीचा, अत्याचारांचा अध्याय संपुष्टात आला!

चार दशके उत्तर प्रदेशला धरले होते वेठीस

Google News Follow

Related

अतीक अहमदच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला. अतीकसह त्याचा भाऊ अशरफ याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हा अध्याय संपला तरी तो जेव्हा सुरू झाला आणि गेली काही वर्षे दहशतीचा नंगा नाच उत्तर प्रदेशात सुरू होता. त्याची अखेर शेवटी त्याच पद्धतीने झाली.

अतीक अहमद हा वयाच्या १७व्या वर्षीच खुनाच्या गुन्ह्याचा आरोपी बनला होता. पण त्यानंतर त्याच्या दहशतीचा आलेख दिवसेंदिवस वर चढत गेला. त्यातून तो संसदेतही लोकप्रतिनिधी म्हणून पोहोचला. फुलपूरमधून त्याने निवडणूक जिंकली. ज्या मतदारसंघात एकेकाळी जवाहरलाल नेहरू यांनी निवडणूक लढविली होती.

अतीकवर १०० गुन्हे दाखल होते. त्यात खंडणी, अपहरण, खून असे अनेक गुन्हे गेल्या चार दशकात नमूद होते. त्याचा संबंध उमेश पाल हत्याकांडाशी जोडला जात असला तरी त्याचा गुन्हेगारी विश्वातला वावर यापेक्षा खूपच मोठा होता.   तो एका गरीब कुटुंबात जन्मला. युवा झाल्यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. आपल्या विरोधकांना खोट्या केसेसमध्ये अडकविणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. साक्षीदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे आणि कायद्याचे कायम उल्लंघन करणे याबद्दल तो ओळखला जाऊ लागला.

१९६२मध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील टांगा चालवत असत. अतीकने आपले शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर त्याला गुन्हेगारी विश्वात येण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. तो रेल्वेमधील कोळसा चोरी करू लागला. तो विकून पैसा कमावणे हा त्याचा पेशा बनला. रेल्वेच्या भंगारासाठी तो कंत्राटदारांना धमकावू लागला.

अवघ्या २७व्या वर्षी त्याने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. बाहुबली म्हणून तेव्हा तो ओळखला जात होता. अलाहाबादमधून त्याने अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. त्यानंतर तिथूनच तो पाचवेळा आमदार म्हणून निवडून आला. १९९६मध्ये तिथून तो समाजवादी पार्टीतर्फे निवडून आला. त्यानंतर त्याने अपना दलमध्ये प्रवेश केला. १९९९ ते २००३पर्यंत तो त्या पक्षात होता. २००२मध्ये तो पुन्हा जिंकला. २००४मध्ये तो समाजवादी पार्टीत आला आणि फुलपूरमधून निवडून आला.

हे ही वाचा:

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जनसागराच्या चरणी अर्पण

कोंडाईबारी घाटात धुळे-सुरत बस दोन ट्रकमध्ये घुसली, सात प्रवासी जखमी

१७व्या वर्षी केला पहिला खून

१९७९मध्ये अतीकवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. तेव्हा त्याचे वय १७ होते. त्यानंतर त्याने आपली दहशत उत्तर प्रदेशात वाढविण्यास सुरुवात केली. गँगस्टर कायद्यानुसार प्रथमच एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तोही अतीक अहमदवर. त्यानंतर अतीक अहमद हा गुन्हेगारी जगताचा बेताज बादशहा झाला. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची गरिबी मात्र हटली. उत्तर प्रदेशातील ताकदवान नेत्यांमध्ये अतीकचा समावेश होऊ लागला. त्यानंतर प्रयागराजमधील काही नामचीन गुंडांशी त्याने संधान बांधले. चांद बाबाशी त्याने हातमिळवणी केली. मग हळूहळू तो राजकीय क्षितिजावर चमकण्याचा प्रयत्न करू लागला. २०१४च्या निवडणुकीत तर अर्ज भरताना त्याच्या नावावर एकही गुन्हा नसल्याची नोंद झाली.

२००५मध्ये राजू पाल हत्याकांडात त्याचे नाव प्रथम आले. त्यासंदर्भात त्याला अटक झाली पण तुरुंगात असतानाही त्याने उत्तर प्रदेशवरील आपली पकड कायम राखली. २००७मध्ये मदरशातील मुलांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला संरक्षण दिल्याचा आरोप अतीकवर झाला. त्यातून त्याची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी झाली. मग मायावतींचे सरकार आले आणि माफियांवर जरब बसू लागली. तशीच परिस्थिती मग योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आली. त्यानंतर मात्र त्याचा आलेख घसरू लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा