रिक्षात आढळला लोकसंख्येचा राक्षस… तब्बल २७ जण करत होते प्रवास!

रिक्षात आढळला लोकसंख्येचा राक्षस… तब्बल २७ जण करत होते प्रवास!

एकीकडे जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने जगभरात वाढत्या लोकसंख्येची चर्चा होत असताना तिकडे उत्तर प्रदेशात मात्र एका घटनेने लोकसंख्येचा भस्मासूर कसा वाढतो आहे, याचे एक उदाहरणच समोर आले.

बकरी ईदनिमित्त नमाज पढून एक अख्खे कुटुंब एका रिक्षातून प्रवास करत होते. पोलिसांनी जेव्हा रिक्षा अडविली तेव्हा त्यात तब्बल २७ जण कोंबून भरल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनाच धक्का बसला.

फतेहपूर येथे ही रिक्षा भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी पोलिसांना ती रिक्षा दिसल्यावर त्यांनी त्या रिक्षाला हटकण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. मात्र नंतर पुढे ही रिक्षा पोलिसांनी अडविली. तेव्हा पोलिसांनाही ही रिक्षा या वेगाने का पळविली जात आहे, याचे उत्तर मिळाले आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

ही रिक्षा पोलिसांनी अडविली आणि त्यातून एकेकाला बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यात चालकासह तब्बल २७ जण कोंबून भरल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

गडकरी म्हणतात, द्वारका द्रुतगती मार्ग २०२३ मध्ये कार्यान्वित होईल

पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून ६५.६६ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल

मितालीने म्हणून केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

विजय मल्ल्याला चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा

 

या रिक्षाचा हा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून एकाच कुटुंबातील एवढे जण एका रिक्षात कोंबले गेल्याबद्दल सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यातच ही रिक्षा भरधाव वेगाने चालविली जात होती, त्यामुळे जर अपघात झाला असता तर त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले असते.

सध्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विधेयक भारतात संमत करण्याची चर्चा सुरू आहे. पण त्याला मुस्लिम धर्मियांकडून विरोधही होत आहे. मुस्लिम कुटुंबांतील ही लोकसंख्येबाबतची बेफिकीरी यानिमित्ताने पुढे आली आहे.

Exit mobile version