अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करत केली तोडफोड, ८ जणांना अटक!

घटनेदरम्यान अभिनेता घरात अनुपस्थित असल्याची माहिती

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करत केली तोडफोड, ८ जणांना अटक!

उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (२२ डिसेंबर) तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला आणि मालमत्तेचे नुकसान केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) आठ सदस्यांना अटक केली, ज्यांना नंतर ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

उस्मानिया विद्यापीठातील अनेक जेएसी नेत्यांचा समावेश असलेल्या एका गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अनेकजण अभिनेत्याच्या घरात घुसून मालमत्तेचे नुकसान करताना दिसत आहेत. कंपाऊंडमधील फुलांच्या कुंड्याही फोडताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अभिनेता अल्लू अर्जुन घरी उपस्थित नव्हता.

हे ही वाचा: 

ठाकरेंच्या अटी-शर्थींवर शिक्कामोर्तब… मात्र, जिंकले अदाणी

पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या काश्मिरी दहशतवाद्याला बंगालमध्ये अटक!

‘पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान’

दिल्लीतील बांगलादेशी होणार हद्दपार

Exit mobile version