पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचे कनेक्शन पुण्यात असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यात संतोष जाधव या अवघ्या २३ वर्षीय तरुणाचे नाव समोर आले आहे. संतोष जाधव याच्यासह सौरव महांकाळ याचेही नाव उघड झाले आहे.
संतोष जाधव हा मंचरचा असून त्याच्यावर ओंकार बाणखेले याच्या खुनाचा आरोप आहे. त्याच्या शोधात सध्या पोलिस आहेत. त्याचा शोध घेत पोलिस मंचर येथील त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याची आई सीता जाधव यांनी तो शार्प शूटर असेल असे वाटत नसल्याचे म्हटले पण त्याने गुन्हा केला असेल तर त्याने पोलिसांच्या हवाली व्हावे असे म्हटले आहे. आपण मुलाला पाठीशी घालणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
संतोष जाधववर मंचरमध्ये चार गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल शेळके यांनी दिली आहे. गेली दोन वर्षे तो फरार आहे. तो राजस्थान, हरयाणा, पंजाबमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिथेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंध आला असण्याची शक्यता आहे. पण अद्याप संतोष पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. बालगुन्हेगारांसह तो याआधी काम करत होता. हरयाणातही त्याने काही गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हे ही वाचा:
मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या
२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी
१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद
केळ्याने होत आहे रे! केळे विक्रेत्यामुळे लागला रिक्षा चोराचा शोध
मूसेवाला याची नुकतीच हत्या झाली होती. पंजाबी गायक असलेला मूसेवाला हा बंदुकांसह गाणी म्हणत असे. त्याने स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला होता. त्याचे बिष्णोई गँगशी शत्रुत्व असलेल्या लोकांशी संबंध होते, त्यातूनच त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.