कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील मुरुगा मठाच्या मुख्य पुजारींवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठाचे पुजारी शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे तसेच त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुरुगा मठ संचलित संस्थेत अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पुजारींवर आहे. या संस्थेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केल्यावर हे प्रकरण समोर आले आहे. यानंतर म्हैसूर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगाविरोधात एफआयआर नोंदवला असून पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवमूर्ति यांना हावेरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
सोमवारी शिवमूर्ती यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शने सुरू झाली आहेत.
दोन विद्यार्थिनींनी म्हैसूरमधील ‘ओदानदी सेवा संस्थान’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला होता. विद्यार्थ्यांनी संबंधित घटना त्यांना सांगितल्यावर संस्थेने ही बाब जिल्हा बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुरुगा मठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचा साडेतीन वर्षांहून अधिक काळ लैंगिक छळ केला जात होता.
हे ही वाचा:
वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी
निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप
लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले
संबंधित ट्रस्ट ही तस्करी आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या बचाव, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी काम करते.