मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी शनिवारी, २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरची ही पहिली सर्वपक्षीय बैठक असेल. दिल्लीत दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती आणि येथील संघर्षग्रस्त परिस्थिती पूर्ववत करण्याच्या दिशेने या बैठकीत चर्चा की जाईल.
आदल्याच दिवशी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नऊ आमदारांनी नॉंगथोम्बम बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील जनतेचा सरकार आणि प्रशासनावरील विश्वास पूर्ण उडाला आहे, असे म्हटले होते.
‘कायद्यानुसार, नियमांचे पालन करून सरकारच्या योग्य प्रशासनासाठी आणि कामकाजासाठी काही विशेष उपायांची अंमलबाजवणी करावी, जेणेकरून लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करता येईल,’ असे या निवेदनात म्हटले होते. या निवेदनावर श्याम सिंग, ठोकचोम राधेश्याम सिंग, निशिकांत सिंग सपम, खवैराकपम रघुमणी सिंग, एस ब्रोजेन सिंग, टी रॉबिंद्रो सिंग, एस. राजेन सिंग, एस केबी देवी आणि वाय राधेश्याम या सर्व नऊ भाज आमदारांनी स्वाक्षरी केली आहे. हे सर्व आमदार मैतेई समुदायाचे आहेत.
हे ही वाचा:
दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट
मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’
पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी
मैतेई समुदायाच्या अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये ३ मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये जातीय संघर्ष सुरू झाला. मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.