डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी (२७ सप्टेंबर) अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणामधील सर्व ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. हे दोनही आरोपी डोंबिवली मधील वडवली आणि देसलेपाडा येथे सहा दिवस लपून बसले होते.
दोन आरोपींपैकी एका आरोपीला रविवारी अटक करण्यात आली, तर दुसऱ्या आरोपीला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहचू नये म्हणून त्यांनी मोबाईल बंद केले होते. पोलिसांनी पहिले वडवली येथील आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली असता देसलेपाडा येथील आरोपीला अटक केली.
हे ही वाचा:
बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून
पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?
धक्कादायक! … स्मशानभूमीत सुरू होती अल्पवयीन मुलीची पूजा
मदतीसाठी तत्पर अग्निशमन दलाच्या ‘फायर बाईक’
या प्रकरणातील ३३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळेल असे प्रयत्न असतील, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कार्ले यांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणासंदर्भात जास्तीत जास्त जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्व येथील भोपर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. या तरुणाने जानेवारी महिन्यात पीडितेवर बलात्कार करून बलात्काराचा व्हिडियो मोबाईल फोन मध्ये बनवून मित्राला दाखवला होता. त्या नंतर त्या मित्राने तो व्हिडियो स्वतःच्या मोबाईल मध्ये घेऊन पीडितेला या व्हिडिओच्या माध्यमातून धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारे हा व्हिडीओ एका कडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असे करता करता ३३ जणांनी गैरफायदा उचलत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.