प्रजासत्ताक दिनानिमित्त दहशतवादी पुन्हा एकदा मोठा कट आखण्याच्या प्रयत्नात आहेत. दहशतवादी दिल्ली आणि पंजाबसह इतर अनेक शहरांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील आयएसआय, इस्लामिक स्टेट आणि अल कायदा यांसारख्या संघटना भारतात दहशत माजवण्याचे कारस्थान रचत आहेत. यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीची मदत घेतली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुरक्षा यंत्रणांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे.
२६ जानेवारीला दिल्ली आणि पंजाबसह इतर राज्ये आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या शहरांवर हल्ला करण्यासाठी रोहिंग्या तसेच अन्सार उल बांगला आणि जमात उल मुजाहिदीन या दोन बांगलादेशी संघटनांची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २६ जानेवारीलाच नाही तर भारतात होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्तानेही सायबर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया
देशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट
भाजप मिशन २०२४ साठी रणनीती आखणार
दहशतवाद्यांनी बनवलेल्या प्लॅननुसार, जर २६ जानेवारीचा योजना यशस्वी झाली नाही तर जी-२० परिषदेच्या निमित्ताने दिल्लीत मोठा सायबर हल्ला करू शकतात. देशात पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर काही लहान संघटना सक्रिय होऊ शकतात आणि स्लीपर सेलसारखे गोरिल्ला हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शीख दहशतवादी गट दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठे दहशतवादी हल्ले करू शकतात, असे गोपनीय माहितीतून समोर आले आहे. खालसा आणि वारिस पंजाब हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात, यासाठी येथे विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे, असा अलर्ट सुरक्षा यंत्रणांनी जारी केला आहे.