28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामासंशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

एनआयएने केला मुंबई पोलिसांना मेल

Google News Follow

Related

येणाऱ्या सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना अधिक सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत एक संशयास्पद व्यक्ती फिरत असून ती व्यक्ती धोकादायक असल्याचे ठरू शकते अशा आशयाचा ईमेल एनआयएने NIA अर्थात नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीतर्फे मुंबई पोलिसांना आला आहे. या मेलमध्ये त्या व्यक्तीचे नाव सरफराज मेमन असे सांगण्यात आले आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात घडवण्यासाठी हि व्यक्ती मुंबई उपनगरातून फिरत तर नाही ना असा संशय एनआयए ने व्यक्त केला आहे. म्हणून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत फिरत असलेली ही व्यक्ती मूळची इंदूर येथे राहणारी असल्याचे एनआयएने पाठवलेल्या ईमेल मध्ये सांगण्यात आले आहे. शिवाय या व्यक्तीने चीन, पाकिस्तान आणि हॉंगकॉंग मध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच ही व्यक्ती मुंबईसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा एनआयएने दिला आहे. संशयित व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे एनआयएने मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या कागदपत्रांमध्ये त्या व्यक्तीचे पासपोर्ट, आधारकार्ड, ड्रायविंग लायसन्स आणि लिविंग सर्टिफिकेट याच्या सर्व प्रति जोडण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

अजितदादांना असे आरोप शोभतात का?

आपत्तीग्रस्तांच्या मदत निधीत भरीव वाढ..जाणून घ्या किती

सरकारी योजनांच्या लाभार्थींची ठेवणार अनोखी ‘आठवण’

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

एनआयएने मुंबई तसेच इंदूर पोलिसांशी संपर्क करून हि सर्व माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, एन आय ए ने पाठवलेल्या या ईमेलनंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आणि मुंबईतील सर्व येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे , पंचतारांकित हॉटेल्स, आणि महत्वाची शासकीय कार्यालये या सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा