१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट

१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत अल कायदा या दहशतवादी संघटनेचा मोठा कट उधळून लावला आहे. यामुळे उत्तर प्रदेश राज्यात होऊ घातलेली मोठी दहशतवादी कारवाई उलथून पडली असून राज्यातील अनेक लोकांचे प्राण यामुळे वाचले आहेत.

रविवार, ११ जुलै रोजी उत्तर प्रदेश राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसला अशी माहिती मिळाली होती की उमर हलमंडी नावाच्या अलकायदाच्या एका आतंकवाद्याला भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. हलमंडी हा मुख्यत्वे पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डर क्षेत्रामधून आतंकवादी कुरबुरी करत असतो. भारतात आतंकवादी कृत्य करण्यासाठी उमर हलमंडीच्या मार्फत आतंकवाद्यांची भरती करण्यात आली असून यातल्या काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना लखनऊमध्ये नियुक्त करण्यात आले.

हे ही वाचा:

‘उज्ज्वल’ भविष्यासाठी शिवसेना प्रयत्नशील?

ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!

उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

यापैकी मिन्हाज, मसिरुद्दीन, शकील अशी काही प्रमुख नावे समोर आली आहेत. यांना असे आदेश देण्यात आले होते की, त्यांच्या इतर काही जिहादी सहकाऱ्यांच्या मदतीने १५ ऑगस्टच्या पूर्वी उत्तर प्रदेश मधील विविध भागांमध्ये आणि त्यातही प्रामुख्याने लखनऊ शहरातील महत्त्वाच्या, गर्दीच्या भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात यावे. यात मानवी बॉम्बचाही समावेश करण्यात आला होता. या आदेशाचे पालन करत अशा प्रकारची दहशतवादी कारवाई करण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. त्यासाठी आवश्यक ती सर्व शस्त्रसामग्री स्फोटके इत्यादी गोष्टींची जमवाजमव सुरू होती.

यासोबतच उत्तर प्रदेश एटीएसला माहिती मिळाली की या सर्व कटाला पूर्णत्वास नेण्यासाठी जी योजना प्रामुख्याने मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन यांनी बनवली आहे. येत्या काही दिवसांमध्येच लखनऊमध्ये केव्हाही दहशतवादी कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुठलाही विलंब न करता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करायचा निर्णय उत्तर प्रदेश एटीएसने घेतला. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके बनवण्यात आली.

या कारवाईत मिन्हाज अहमदच्या लखनऊ मधील दुबग्गा भागातील राहत्या घरावर एटीएस पथकाकडून छापा मारण्यात आला. त्यावेळी मिन्हाज घरीच सापडला. त्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली आहेत. तर त्यासोबतच एक पिस्तुलही सापडले आहे. तर एटीएसच्या दुसऱ्या मसीरुद्दीन याच्या लखनऊ मधील मोहिबुल्लापुर येथील निवासस्थानी धाड टाकली असून मसीरुद्दिनला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरीही मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली आहेत.

Exit mobile version