अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

दहशतवादी संघटना अल-कायदाची धमकी

अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात दहशतवादीकडून मोठी धमकी मिळाली आहे. अल-कायदाने अतिकच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाचा बदला घेणार असल्याचे सात पानी मासिक प्रसिद्ध केले आहे . कुख्यात दहशतवादी संघटनेच्या या धमकीनंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

प्रयागराजमध्ये १५ एप्रिलच्या रात्री माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी या नेमबाजांनी ही हत्या केली. तिघेही पत्रकार म्हणून आले, त्यानंतर अतिक आणि अशरफ यांचे माध्यमांशी बोलणे सुरू करताच तिघांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अतिकला ८ गोळ्या लागल्या. या हत्येचा पोलीस तपस सुरु आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर पाटण्यात अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. देशात अतिक अहमदच्या हत्येनंतर या घटनेला राजकीय रंग मिळाला आहे. ईदपूर्वी प्रयागराजसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचे शुक्रवारच्या नमाजाच्यावेळी दिसून आले. अशा स्थितीत अल कायदाच्या धोक्याने आगीत आणखीनच भर पडली आहे .

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर तपासात गुंतलेल्या पोलिस पथकांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. अतीकचे सुमारे ८०० नंबर अचानक बंद झाले आहे. या सर्व मोबाईल क्रमांकावर पोलिसांची नजर होती. बंद झालेल्या क्रमांकांची तपासणी केली जात आहे, त्यांचे कॉल डिटेल्स घेतले जात आहेत.

हे ही वाचा:

तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

कृतयुग किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय (अक्षय्य) तृतिया

दरम्यान, पोलीस चकमकीत ठार झालेला अतिक अहमद याचा मुलगा असद याच्या मोबाईल चॅटमध्ये मोठा खुलासा झाला आहे. असद आणि त्याच्या वकिलाच्या मोबाईल चॅट समोर आल्या आहेत. वकील खान सुलत हनिफ यांनी उमेश पालचा फोटो हत्येच्या ५ दिवसांपूर्वी असदला पाठवला होता. आता पोलीस त्याचा तपास करत आहेत. खून प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाबीची पडताळणी केली जात आहे.

Exit mobile version